पुजा बोनकिले
गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.