सकाळ वृत्तसेवा
मेष : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. व्यवसायात वाढ होईल.
वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
मिथुन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. मनोबल कमी राहील.
कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
सिंह : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
कन्या : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
तुळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृश्चिक : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
धनु : हितशत्रुंवर मात कराल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
मकर : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
कुंभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
मीन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.