Horoscope 5 October 2025: 'या' राशीच्या लोकांना प्रियजनांचा सहवास लाभेल

पुजा बोनकिले

मेष :

प्रियजनांचा सहवास लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन :

गुरूकृपा लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कर्क :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

सिंह :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

कन्या :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

तुळ :

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.

वृश्‍चिक :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.

धनु :

उत्साह व उमेद वाढेल. मनोबल उत्तम राहील.

मकर :

आर्थिक सुयश लाभेल. शासकीय कामे मार्गी लावू शकाल.

कुंभ :

कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

मीन :

काहींना एखादी चिंता लागून राहील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.