Horoscope 8 November 2025: 'या' राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होतील

सकाळ वृत्तसेवा

मेष :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. शत्रुपिडा नाही.

वृषभ :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक लाभ होतील.

मिथुन :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील.

कर्क :

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

सिंह :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कन्या :

राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

तुळ :

एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.

वृश्‍चिक :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

धनु :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

मकर :

हितशत्रुंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कुंभ :

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मीन :

प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.