Horoscope 9 January 2026: 'या' राशीच्या लोकांचे मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील

Puja Bonkile

मेष :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ :

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मिथुन :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कर्क :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह :

कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

कन्या :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

तुळ :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

वृश्‍चिक :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

धनु :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मकर :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कुंभ :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

मीन :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.