Monika Shinde
दिवसभरात ताण-तणाव, धावपळ, आणि थकवा वाटतो का? ध्यान ही एक सोपी पद्धत आहे, जी तुमचं मन शांत करतं आणि ऊर्जा वाढवतं.
ध्यान म्हणजे मनाला वर्तमान क्षणात एकाग्र करणे. श्वासावर लक्ष ठेवणे, विचारांना शांत करणे, आणि अंतर्मनाशी संवाद साधणे हेच खरं ध्यान!
व्यस्त दिनक्रमातही फक्त १० मिनिटं स्वतःसाठी राखा. सकाळी किंवा रात्री जिथे वेळ मिळेल, तिथे ध्यान करा. नियमितता महत्त्वाची आहे.
ध्यानामुळे तणाव कमी होतो, ज्यामुळे भावनिक खाण्यावर नियंत्रण मिळतं. याचा परिणाम वजन नियंत्रणावरही होतो वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध!
शांत मनामुळे पचनक्रिया चांगली होते. ध्यान केल्यावर शरीर “relax” मोडमध्ये जातं, जेवण योग्यरीत्या पचतं आणि फुगणं, अपचन कमी होतं.
ध्यानामुळे चिंता, नैराश्य आणि चिडचिड कमी होते. झोप चांगली लागते, एकाग्रता वाढते आणि मन प्रसन्न राहते. हे मानसिक आरोग्यासाठी अमूल्य आहे.