Mayur Ratnaparkhe
दलाई लामा तिबेटचे सर्वोच्च आध्यात्मिक गुरू आहेत.
दलाई लामा यांचा जन्म ६ जुलै १९३५ रोजी उत्तर तिबेटमधील आम्दो येथे झाला.
दलाई लामा हे एका लहानशा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले आहेत.
दलाई लामा बालपणातील मूळ नाव ल्हामो थोंडुप(Lhamo Thondup) होते.
त्यांना तेरावे दलाई लामा थुबतेन ग्यात्सो यांचा अवतार म्हणून ओळखले जाते.
दलाई लामा यांचे खरे नाव तेन्झिन ग्यात्सो (Tenzin Gyatso) आहे आणि ते १४ वे दलाई लामा आहेत.
दलाई लामा यांचे शिक्षण तिबेटमध्ये झाले. त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षी मठ शिक्षण घेण्यास सुरुवात केली.
१९५९मध्ये वयाच्या २३ व्य वर्षी ल्हासा येथील जोखांग मंदिरात अंति परीक्षा दिली.
दलाई लामा यांना परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना गेश ल्हारम्पा ही पदवी मिळाली.