IPL: लखनौविरुद्ध 'हा' कारनामा करणारा दिल्ली पहिलाच संघ

प्रणाली कोद्रे

दिल्लीचा विजय

आयपीएल 2024 स्पर्धेत 26 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्स संघाला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला.

Delhi Capitals | Sakal

168 धावांचे आव्हान

या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर 168 धावांचे आव्हान ठेवले होते.

Delhi Capitals | Sakal

दिल्लीने केलं आव्हान पूर्ण

हे आव्हान दिल्लीने 18.1 षटकात 4 विकेट्स गमावत 170 धावा करत पूर्ण केले.

Delhi Capitals | Sakal

पहिला संघ

त्यामुळे लखनौविरुद्ध 160 पेक्षा अधिक धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करणारा दिल्ली हा पहिलाच संघ ठरला.

Delhi Capitals | Kuldeep Yadav | Sakal

कोणालाचं न जमलेला कारनामा

यापूर्वी लखनौविरुद्ध कोणत्याच संघाला 160 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करता आला नव्हता.

LSG vs DC | IPL | Sakal

पहिला विजय

याशिवाय दिल्लीचा हा आयपीएलमध्ये लखनौविरुद्ध पहिलाच विजय देखील ठरला आहे.

Delhi Capitals | Sakal

दिल्ली विरुद्ध लखनौ

दिल्लीने यापूर्वी लखनौविरुद्ध 3 सामने आयपीएलमध्ये खेळले होते. या तिन्ही सामन्यात लखनौने दिल्ल्लीला पराभवाचा धक्का दिला होता.

LSG vs DC | IPL 2024 | Sakal

फ्रेझर-मॅकगर्क IPL इतिहासात असा कारनामा करणारा पहिलाच क्रिकेटर

Jake Fraser-McGurk | Sakal