सकाळ डिजिटल टीम
१ किलो कोळंबी,१ चमचा लाल तिखट पावडर ,१/२ चमचा हळद पावडर,मीठ४ कांदे (स्लाइस केलेले)३ चमचे आले-लसूण पेस्ट,१ टोमॅटो (स्लाइस केलेला),२ चमचे धने पावडर,१ चमचा बिर्याणी मसाला..
१/२ कप पाणी,१ चमचा गरम मसाला,कोथिंबीर आणि पुदिन्याची पाणे १/४ कप कारमेलाईज्ड कांदे,१/४ कप तूपात भाजलेले काजू,४-५ कप बासमती तांदूळ शिजवलेला (मीठ घालून)
कोळंबीला लाल तिखट पावडर, हळद पावडर आणि मीठ घालून ३०-४५ मिनिटं मॅरिनेट करा. नंतर, मॅरिनेट केलेले प्रॉन्स शॅलो फ्राय करा.
कोळंबी शॅलो फ्राय केलेल्या तेलात कांदे, आले-लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परता.
धने पावडर, बिर्याणी मसाला आणि मीठ घालून चांगले परतून घ्या. १/२ कप पाणी घालून मसाला अर्धा शिजवून घ्या. त्यात कोळंबी आणि तळलेला कांदा घालून मिक्स करून घ्या कोळंबी शिजेपर्यन्त झाकून ठेवा अधून मधून मिक्स करत राहा.
एका पातेल्यात पाणी गरम करा. पाण्याला उकळी आला नंतर त्यात खडा मसाला व मीठ टाकला नंतर तांदूळ घाला. नव्वद टक्के तांदूळ शिजवून घ्या.
शिजवलेला तांदूळ आणि कोळंबी ग्रेवी यांचा लेयर लावण्यासाठी एक मोठ जाड तळाच भांड घ्या. त्यात तळात तेल लाऊन घ्या...
नंतर शिजवलेलातून अर्धा भात पसरवून घ्या. मग कोळंबी ग्रेवीचा लेयर लावा. तळलेला कांदा व पुदिना आणि कोथिंबीर हे पण घाला. हे सगळे दोनदा याच पद्धतीने करा. वरचा लेयरला तळलेले काजू घाला.
झाकण ठेऊन 10-20 मिनिटं कमी आचेवर दम द्या.
गरमागरम बिर्याणी सर्व्ह करा आणि तिचा आनंद घ्या.