जेवण चविष्ट बनवण्याबरोबरच तुपाचे आरोग्यासाठीचे देखील अनेक फायदे आहेत. मात्र, तुम्हाला माहितीये का की तूप आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर असतं?.तुपामध्ये ब्युटीरिक अॅसिड, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, व्हिटॅमीन बी१२, व्हिटॅमीन (A,D,E,K) मोठ्या प्रमाणात आढळतात, जे त्वचेसाठी लाभदायक असतात. .तुपाचे काही थेंब चेहऱ्यावर मसाज केल्याने अनेक फायदे होतात आणि अनेक त्वचेच्या समस्या दूर होतात. .तूप नैसर्गिक मॉईश्चरायझर म्हणून काम करतं. ज्यामुळे त्वचा मऊ बनते. .तुपामधील ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. .रात्री डोळ्यांच्या खाली तुपाने मसाज केल्याने डार्क सर्कल्सची समस्या दूर होते..चेहऱ्यावर तुपाने मसाज केल्याने रक्तप्रवाह चांगला होतो, ज्यामुळे त्वचा चकचकीत आणि टवटवीत दिसते. .ओठ सर्वांचेच फाटतात. अशावेळी जर ओठांना तुप लावलं तर ओठ नाजूक राहतात. .तुपासोबत जर केसरचा वापर केला तर, त्यामुळे त्वचेला दुप्पट फायदा होतो.