Aarti Badade
जगाप्रसिद्ध हापूस आंब्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे 'देवगड किल्ला' हा १७ व्या शतकातील एक अत्यंत प्रेक्षणीय ऐतिहासिक सागरी किल्ला आहे.
Devgad Fort Sindhudurg Tourism
Sakal
या किल्ल्याची बांधणी १७२९ मध्ये मराठा सरदार दत्ताजीराव आंग्रे यांनी केली, तर गोमुखी प्रवेशद्वाराच्या रचनेमुळे अनेक इतिहासकार याला शिवकालीन मानतात.
Devgad Fort Sindhudurg Tourism
Sakal
हा किल्ला देवगड खाडी आणि अरबी समुद्राच्या संगमावर एका उंच टेकडीवर वसलेला असून, येथून संध्याकाळी समुद्रात मावळणाऱ्या सूर्याचे चित्तथरारक दृश्य दिसते.
Devgad Fort Sindhudurg Tourism
Sakal
किल्ल्याला तीन बाजूंनी विस्तीर्ण समुद्र असून, मुख्य भूभागाकडे कठीण कातळात खोल खंदक खोदून त्यावर दगडी तटबंदी उभारून हा किल्ला सुरक्षित करण्यात आला आहे.
Devgad Fort Sindhudurg Tourism
Sakal
देवगड किल्ल्याच्या प्रमुख आकर्षणांमध्ये १९१५ मध्ये ब्रिटिश काळात बांधलेले भव्य दीपगृह, ऐतिहासिक बुरूज आणि जुन्या काळातील तोफांचा समावेश होतो.
Devgad Fort Sindhudurg Tourism
Sakal
किल्ल्याच्या विस्तीर्ण परिसरामध्ये श्री हनुमानाचे (मारुतीचे) एक सुंदर मंदिर असून, येथे पर्यटकांना अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरण अनुभवता येते.
Devgad Fort Sindhudurg Tourism
Sakal
सिंधुदुर्ग किल्ला आणि तारकर्ली बीचप्रमाणेच देवगड किल्ला आणि येथील समुद्रकिनारा हा सुट्ट्यांमध्ये कुटुंबासह वन डे ट्रिप प्लॅन करण्यासाठी एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे.
Devgad Fort Sindhudurg Tourism
Sakal
Gaganbawada Hill Station Kolhapur
Sakal