Amit Ujagare (अमित उजागरे)
अखेर राजीनामा
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे.
धनंजय मुंडेंचं शिक्षण
पण इतकी राजकीय ताकद दाखवणारे धनंजय मुंडे यांचं शिक्षण किती झालंय माहितीए का?
विविध भागांत शिक्षण
मुंडे यांचं शालेय, महाविद्यालयीन शिक्षण हे विविध भागांमध्ये झालं आहे.
प्राथमिक शिक्षण
यांपैकी त्यांचं प्राथमिक शिक्षण बीड जिल्ह्यातील परळीच्या 'न्यू इंग्लिश स्कूल'मध्ये झालं.
पुण्यात शिक्षण
त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले. या ठिकाणी सिम्बायोसिस इंटरनॅशन स्कूलमधून त्यांनी प्रवेश घेतला.
या विषयात पदवी
या ठिकाणी त्यांनी 'सोशल सायन्स' या विषयात पदवी घेतली.
भाजपत प्रवेश
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी भाजपमार्फत राजकारणात प्रवेश केला.
गोपिनाथ मुंडेंसोबत वाद
गोपिनाथ मुंडेंसोबत वाद झाल्यानंतर ते शरद पवारांच्या नेृत्वखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.
अजित पवारांसोबत
राष्ट्रवादी फुटल्यानंतर धनंजय मुंडे आता अजित पवार यांच्या नेृत्वाखालील राष्ट्रवादीत आहेत.