सकाळ वृत्तसेवा
संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा उजवा हात म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
सरपंच हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंच्या मागे अनेक प्रकरणं लागली. कृषी विभागातील भ्रष्टाचार, ऑफिस ऑफ प्रॉफिट, गुंडांशी असलेले संबंध..
यासह करुणा मुंडे यांनी त्यांचा मुंडेंविरोधातला लढा आणखी तीव्र केला. न्यायालयीन लढ्यामध्ये दोन कोर्टामध्ये मुंडेंना हार पत्कारावी लागली
धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नीचा दर्जा आपल्याला मिळावा, अशी यासाठी करुणा मुंडे लढत आहेत. तसे पुरावे त्यांनी कोर्टात सादर केले.
करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचं इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्र कोर्टात सादर केलं. कोर्टाने प्राथमिकदृष्ट्या स्वीकारलेलं आहे
धनंजय मुंडेंच्या इच्छापत्रामध्ये करुणा मुंडे ह्या पहिल्या पत्नी असल्याचा उल्लेख आहे. तसा दावा करुणा मुंडेंनी केला आहे
इच्छापत्रामध्ये धनंजय मुंडे म्हणतात, भविष्यात संपत्तीबाबत वाद उत्पन्न होऊ नये म्हणून मी संपत्तीबाबत इच्छापत्र लिहून ठेवत आहे
''माझ्या आयुष्यात गृहिता क्रमांक एक- करुणापासून मला सीशिव आणि शिवानी ही दोन मुलं आहेत''
''गृहिता क्रमांक दोन- राजश्रीपासून मला वैष्णवी, जान्हवी आणि आदिश्री या तीन मुली आहेत''
''माझ्या सर्व मुला-मुलींना माझ्या संपत्तीचे समप्रमाणात वारस घोषित करतो. माझ्या पश्चात दोन्ही पत्नी आणि मुलांचा संपत्तीवर समान अधिकार असेल''
''माझ्या नावे कोणतीही पेन्शन मिळत असेल तर दोन्ही गृहिता ती समप्रमाणात वाटून घेण्यास पात्र असतील'' असं इच्छापत्र धनंजय यांनी केल्याचा दावा करुणा यांनी कोर्टात केला.