Shubham Banubakode
एमएस धोनीला ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखलं जातं. त्याचा शांत आणि संयमी स्वभाव त्याला इतरांपासून वेगळं ठरवतो.
पण, धोनीबाबत अनेक अफवा पसरवल्या जातात. या अफवा ऐकून अनेकदा हसू अनावर होतं.
दरम्यान, धोनीला नुकताच एका मुलाखतीत त्याच्याबाबतच्या अफवांबाबत विचारण्यात आलं.
“तुझ्याबद्दल ऐकलेली सर्वात हास्यास्पद अफवा कोणती?” असा प्रश्न त्याला विचारण्यात आला.
यावेळी धोनीने दिलेल्या उत्तराने उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.
धोनी म्हणाला की "मी रोज ५ लिटर दूध पितो ही माझ्याबाबतची अफवा मला हास्यास्पद वाटते''
पुढे बोलताना धोनीने मी कधीही इतकं दूध पीत नाही. मला ते शक्यही नाही. याशिवाय दुधापासून बनवलेले पदार्थही मला जास्त आवडत नाही.