Shubham Banubakode
आयपीएलला १७ वर्ष पूर्ण झाली असून १८वा हंगाम सुरु आहे. या १७ वर्षात अनेक खेळाडू आयपीएल खेळून निवृत्त झाले आहे.
मात्र, कोहली, धोनी आणि रोहित शर्मा पहिल्या हंगामापासून आयपीएल खेळत आहेत.
दरम्यान, या तिन्ही खेळाडूंना पहिल्या हंगामात किती मानधन मिळालं होतं, तुम्हाला माहिती का?
पहिल्या हंगामात धोनी सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला चेन्नईने ६ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं.
चेन्नई सुपर किंग्सने धोनीसाठी बेस प्राइसच्या चारपट रक्कम मोजली होती.
रोहित शर्माला पहिल्या हंगामात डेक्कन चार्जर्स संघाने ४.२ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होतं.
पहिल्या हंगामात विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने फक्त १२ लाख रुपयांत खरेदी केले होतं.
२००७ टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार धोनी आयपीएलमध्येही स्टार ठरला.
धोनीबरोबरच रोहित शर्माही २००७ च्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता.
कोहलीला पहिल्या पहिल्या हंगामात कमी किंमतीत खरेदी करण्यात आलं होतं. मात्र, त्याने लवकरच आयपीएलमघ्ये नाव कमावलं.