Yashwant Kshirsagar
अनेक वेळा रात्री पोटभर जेवण केले तरी सकाळी लवकर खूप भूक लागते.
सकाळी झोपेतून उठल्यावर पोट रिकामे असल्याचे जाणवते आणि भूक लागल्यासारखे होते.
पोट रिकामे असल्या कारणाने थकवा देखील जाणवतो.
खरं तरं सकाळी-सकाळी भूक लागण्याचे कारण ब्लड शुगर लेव्हल आणि हार्मोन्स आहेत.
रात्री जेवण केल्यानंतर ब्लड शुगर झपाट्याने वाढते पण नंतर हळू-हळू कमी होते.
शुगर लेव्हल कमी झाल्यानंतर भूक लागते.
अनेकदा रात्री जेवण केल्यानंतर पेनक्रियाजमध्ये जास्त इन्सुलिन तयार होते आणि यामुळे ब्लड शुगरची लेव्हल वाढते.
अशावेळी रात्री उशिरा जेवण करण्याची सवय सोडली पाहिजे. झोपी जाण्याआधी किमान दोन तास आधी जेवण केले पाहिजे. हे आरोग्यासाठी चांगले राहिल.
वरील लेख सामान्य माहितीवर आधारीत आहे. कोणतीही कृती अंमलात आणण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.