Sandip Kapde
एक कोटींचा हिरा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मस्तकावर अर्पण
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी एका भक्ताने तब्बल एक कोटी रुपयांचा हिरा अर्पण केला आहे.
या हिऱ्यामुळे गणपती बाप्पाची मूर्ती अधिक तेजस्वी दिसत आहे.
गणपती बाप्पांच्या आगमनासाठी जय्यत तयारी झाली आहे आणि बाप्पाची सुंदर मूर्ती संपूर्ण सोन्याच्या आभूषणांनी सजवली आहे.
भक्ताने दोन दिवसांपूर्वी हा अनमोल हिरा अर्पण केला होता, जो बाप्पाच्या मस्तकावर प्रतिष्ठित करण्यात आला आहे.
सिंह रथातून दगडूशेठ गणपतीची मिरवणूक
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी खास सिंह रथाची सजावट करण्यात आली आहे.
हा सिंह रथ विविध रंगांच्या आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे.
सकाळी ८ वाजता बाप्पाची मूर्ती मूळ मंदिरातून बाहेर काढण्यात येणार असून, सिंह रथातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यानंतर बाप्पा जटोली शिव मंदिरात विराजमान होतील.
पुणेकरांची श्रीगणेशाचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी
पुणे शहरातील घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये बाप्पा विराजमान होणार आहेत.
पुण्यातील गणेशोत्सव हा अत्यंत वैभवशाली परंपरेचा भाग आहे आणि मानाच्या पाच गणपतींच्या प्राणप्रतिष्ठेचा विशेष महत्त्व आहे.
सकाळपासूनच नगारा वादन, ढोल ताशा आणि लेझिम पथकांच्या वादनाने पुणेकर गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.