सूरज यादव
राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी राज्यातल्या मटण विक्रेत्यांसाठी मल्हार झटका प्रमाणपत्राची घोषणा केलीय. यामुळे नवा वाद सुरू झाला आहे.
राज्यात झटका मटण दुकानांची नोंदणी करायची आहे. हिंदू संचालित आणि हिंदू ग्राहकांसाठी सेवा पुरवण्याचा हेतू त्यामागे असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय.
नितेश राणेंच्या या घोषणेनंतर हलाल मटण आणि झटका मटण याची चर्चा सुरू झालीय. मटण कापण्याच्या या दोन पद्धतीतला फरक समजून घेऊ.
हलाल मटण पद्धतीत प्राण्याच्या मानेवर चाकू फिरवतात. यात शीर धडावेगळं केलं जात नाही. मान कापलेल्या प्राण्याच्या शरीरातून सगळं रक्त बाहेर पडतं.
हलाल पद्धतीने कापल्यास प्राण्याचा तडफडून मृत्यू होतो. या पद्धतीने प्राण्यांची कत्तल करण्यासाठी जमीयत उल उलेमा ए हिंदकडून हलाल सर्टिफिकेट दिलं जातं.
झटका मटण म्हणजे यात एकाच झटक्यात प्राण्याची मान कापली जाते. एकाच झटक्यात कत्तल केल्यानं तडफडून मृत्यू होत नाही.
झटका पद्धतीत प्राण्याला बेशुद्धही केलं जातं. शीख आणि हिंदू समुदाय प्राणी कापण्यासाठी ही पद्धत वापरतात.
एक लिटर थंडाईमध्ये किती भांग मिसळावी? जाणून घ्या