सूरज यादव
प्रजासत्ताक दिन हा दर वर्षी २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. अनेकांना या दिवसाचं महत्त्व माहिती नसतं.
स्वातंत्र्यदिन हा भारतीय स्वातंत्र्याच्या आठवणींचा दिवस आहे, तर प्रजासत्ताक दिन हा भारताच्या राज्यव्यवस्थेच्या नवीन सुरुवातीचा दिवस आहे.
प्रजासत्ताक दिन हा भारतीय संविधान लागू केल्याच्या निमित्ताने साजरा केला जातो. संविधान स्वीकारल्यानंतर भारत प्रजासत्ताक बनला.
भारताच्या संविधान सभेनं २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारलं. मात्र २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू झाले.
२६ जानेवारी प्रमाणे १५ ऑगस्ट हा दिवसही खूप महत्त्वाचा आहे. भारत याच दिवशी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता.
भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. म्हणून १५ ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येतो.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली. त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण म्हणूनही हा दिवस साजरा करण्यात येतो.
इंग्रजांच्या राजवटीतून स्वतंत्र झाल्यानंतर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. एका नव्या सुरुवातीचं प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो.