Sandeep Shirguppe
चहा पाव, मसाला पाव, वडापाव, भजी पाव आपण नेहमी खात असतो पण पाव खाण्याचे तोटे माहिती आहेत का?
पावामध्ये असणारी रिफाईन्ड साखर आपल्या मॅटॅबॉलिझमवर थेट परिणाम करत असतो.
स्वादुपिंडातून जास्त प्रमाणात इन्शुलिन शोषले जाते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढते.
पावात ग्लुटेन असल्याने पाव खाल्ल्यावर गॅसेसच्या समस्या उद्भवतात. काही वेळा पाव पचायला २ ते ३ दिवस लागतात.
पावात साखर किंवा फ्रुक्टोज कॉर्न सिरप असते. यामुळे बॅड कॅलरीज वाढण्याचा धोका असतो.
शरीराला आवश्यक असणारे फायबर, व्हिटॅमिन कींवा खनिजे असे कोणतेच घटक पावातून मिळत नाहीत.
पाव तयार करताना एन्झाइम्स घातले जातात. याने पाव दिर्घ काळ टिकतो. याने अॅलर्जी होण्याची शक्यता होते.
जास्त पाव खाल्ल्याने बद्धकोष्ठता, ऍसिडिटी आणि गॅससारख्या समस्या उद्भवू शकतात.