सकाळ डिजिटल टीम
तिळात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस अशा घटकांचा समावेश असतो, जे हाडांसाठी खूप फायदेशीर ठरतात. थंडीच्या दिवसात तीळ खाल्ल्यास हाडांचे आणि सांधेदुखीचे त्रास कमी होतात.
दररोज एक मोठा चमचाभर तीळ खाल्ल्याने दात मजबूत होतात आणि त्यांची स्वच्छता राखली जाते.
तिळात असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स रोग प्रतिकारशक्तीला वाढवतात आणि शरीराला विविध रोगांपासून संरक्षण करतात.
तिळात सेसमीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीला थांबवते. फुफ्फुस, पोट, गर्भाशय, स्तन आणि रक्ताच्या कॅन्सरची शक्यता कमी होते.
तिळाचे तेल त्वचेला मुलायम ठेवते आणि कोरडी पडू देत नाही. थंडीमध्ये त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तिळ खाणे उपयुक्त आहे.
उष्णतेचा त्रास असलेल्या व्यक्तींनी तिळ खाणे प्रमाण कमी करावे किंवा पूर्णपणे टाळावे.
तिळ पचायला जड असतात. त्यामुळे थंडीमध्ये भाकरीला तीळ लावून खाणे फायदेशीर ठरते.
लघवी साफ न होणाऱ्यांनी तीळ, दूध आणि खडीसाखर खाल्ल्यास मूत्रपिंडाचे त्रास कमी होतात.
तिळाचे तेल केसांवर लावल्याने केसांची वाढ चांगली होते.
हिवाळ्यात संक्रांती सणाच्या वेळी तिळाचे पदार्थ खाण्याचे महत्त्व असते. हिवाळ्यात त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी तिळ फायदेशीर ठरतात.