सकाळ डिजिटल टीम
स्मार्ट वॉचमुळे खरचं कॅन्सर होवू शकतो का? या मागचे सत्य तुम्हाला माहित आहे का?
स्मार्ट वॉचमुळे खरचं कॅन्सर होवू शकतो का? जाणून घ्या काय आहे सत्य
काही स्मार्ट घड्याळांमध्ये (smartwatches) फ्लोरोइलास्टोमर (fluoroelastomer) नावाचे रसायन वापरले जाते, जे आरोग्यसाठी काही प्रमाणात हानिकारक असू शकते.
काही स्मार्ट घड्याळांमध्ये या रसायनांचे प्रमाण जास्त असू शकते, जे कर्करोग आणि यकृताच्या (liver) समस्यांशी संबंधित मानले जाते.
स्मार्ट घड्याळे वापरताना डेटा चोरी, डिव्हाइस हॅकिंग (hacking), फिशिंग (phishing) आणि मालवेअर (malware) यांसारख्या गोष्टींमुळे सुरक्षेचा धोका देखील निर्माण होऊ शकतो.
स्मार्ट घड्याळांमुळे कर्करोग होतो, असे ठोसपणे म्हणता येणार नाही. काही अभ्यासांमध्ये रसायनांचा उल्लेख असला तरी, कर्करोगाचा धोका वाढवण्याबद्दल कोणताही निर्णायक पुरावा नासल्यचे सांगीतले जाते.
स्मार्ट घड्याळे आरोग्यासाठी काही फायदे देखील देऊ शकतात. ते फायदे कोणते जाणून घ्या.
ॲट्रियल फायब्रिलेशन (atrial fibrillation) किंवा ग्लुकोजची पातळी (glucose level) तपासण्यासाठी इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG) क्षमता वापरू शकतात. तसेच, कर्करोगातून बरे झालेल्या लोकांना त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि उपचारांनंतर निरोगी राहण्यासाठी मदत करू शकतात.
स्मार्ट घड्याळे वापरण्यापूर्वी त्यांच्यातील रसायनांबद्दल आणि संभाव्य धोक्यांबद्दल माहिती असणे महत्त्वाचे आहे. परंतु, सध्याच्या माहितीनुसार, स्मार्ट घड्याळांमुळे कर्करोग होतो याचा कोणताही ठोस पुरावा नाही.