संतोष कानडे
अनेकांना वाटतं साप डूक धरतो आणि माणसाच्या मागावर येतो. परंतु यात अजिबात तथ्य नाही. हा केवळ एक गैरसमज लोकांच्या मनात आहे.
सापाला मारण्याची काहीच गरज नसते, कारण साप कधीच मानवाला उगाच चावत नाही किंवा डूक धरत नाही अथवा मागावरही येत नाही.
कारण सापांच्या मेंदूचा विकास झालेला नाही त्यामुळे त्यांच्या स्मरणात काहीच राहत नाही. त्यामुळे साप मागावर येण्याचा संबंधच नाही.
त्यामुळे साप व्यक्तीला ओळखू शकत नाही. मग साप डूक धरण्याचे कारणच नाही.
सापांबद्दलची माहिती आता डॉक्युमेंटरी, पुस्तके, जनजागृती कार्यक्रम, बॅनर्स, पोस्टर्सद्वारे दिली जाते.
सापांबद्दलच्या अंधश्रद्धा, गैरसमज, शास्त्रीय माहितीचा अभाव, अज्ञान आणि भितीमुळे सर्पहत्या होते.
पण काही वेळेस सापाला इतक्या भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागते जी परिस्थिती मरणापेक्षा जास्त त्रासदायक असते.
साप घरात, घराजवळील बिळात किंवा अशा काही ठिकाणी लपून राहतो ज्यातून माणूस त्या सापाला बाहेर नाही काढू शकत, तेव्हा भीती निर्माण होते.
जर साप बाहेर नाही आला तर रात्री बाहेर पडेल आणि घरात घुसून दंश करेल, साप डूक धरेल म्हणून माणसं घाबरतात.