Saisimran Ghashi
वाढलेले वजन आणि सुटलेले पोट कमी करण्यासाठी घरच्या घरी करता येणारे 100% फायदेशीर उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी योगाचे महत्त्व खूप आहे. विशेषतः सुर्य नमस्कार, कोबरा पोझ, प्लँक पोज, आणि वक्रासन पोटाच्या चरबीला कमी करण्यात मदत करतात.
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडन्ट्स असतात जे शरीराची चरबी जाळण्यास मदत करतात. सकाळी उठल्यानंतर ग्रीन टी पिणे चांगले ठरते.
वजन कमी करण्यासाठी कार्डिओ व्यायाम प्रभावी ठरतो. घरात सहज करता येणारे व्यायाम जसे की स्किपिंग, जॉगिंग इन प्लेस, जम्पिंग जॅक्स, आणि हाय नीस पोटावरची चरबी कमी करतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारतात.
संतुलित आहार घ्या. जेवणात प्रथिने, फायबर्सचे प्रमाण वाढवा.
रोज किमान ८-१० ग्लास पाणी प्या. पाणी पिण्यामुळे तुमचे चयापचय वाढते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात.
शरीराला आवश्यक असलेल्या कॅलोरींचा अंदाज घेऊन कमी आहार घ्या. पण अत्यधिक कॅलोरी कटींग टाळा, कारण यामुळे शरीराची ऊर्जा कमी होईल आणि वजन कमी होणे कठीण होईल.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही .