Saisimran Ghashi
चेहऱ्यावर कोरफड म्हणजेच अलोवेरा जेल लावल्याने अनेक फायदे होतात.
पण हिवाळ्यात कोरफड चेहऱ्यावर लावत असल्यास, नियमित वापर त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
हिवाळ्यात थंड हवेमुळे त्वचा कोरडी पडते. कोरफड त्वचेतील नमी टिकवून ठेवते आणि हायड्रेटेड ठेवते, ज्यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार दिसते.
कोरफड मध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील सूज, लालसरपणा आणि इतर दाहकता कमी होऊ शकते.
कोरफडमध्ये अँटी-ऑक्सिडन्ट्स असतात, जे त्वचेतील कोलेजन निर्माण वाढवतात आणि त्वचेला तरुण ठेवतात.
कोरफड चेहऱ्यावरून अतिरिक्त तेल शोषून घेतं, ज्यामुळे मुरुमांची समस्या कमी होऊ शकते. त्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेला साफ ठेवतात.
त्वचेसोबतच केसांना कोरफड लावल्याने केस मुलायम, चमकदार बनतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.