भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे सदस्य कोण होते माहीत आहे का? जाणून घ्या

Anushka Tapshalkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अध्यक्ष)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदामंत्री आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी समता, बंधुता आणि न्याय यावर आधारित राज्यघटनेचा मसुदा तयार केला.

Dr. B. R. Ambedkar | sakal

अल्लादी कृष्णस्वामी अय्यर

एक प्रतिष्ठित वकील आणि कायद्याचे अभ्यासक, त्यांनी राज्यघटनेच्या मसुदा प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.

Alladi Krishnaswamy Iyer | sakal

डी. पी. खेतान

प्रसिद्ध वकील आणि व्यवसायिक, ते मसुदा समितीचे सदस्य होते. ते आधुनिक भारतीय कायद्याचे प्रणेते होते. दुर्दैवाने, त्यांच्या निधनामुळे टी. टी. कृष्णमाचारी यांनी त्यांची जागा घेतली.

D.P. Khetan | sakal

एन. माधव राव

संस्थात्मक धोरणांचा अनुभव असलेले प्रशासक व भारतीय नागरी सेवक, त्यांनी राज्यघटनेच्या तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींसाठी महत्त्वाचे योगदान दिले.

N. Madhavrao | sakal

के. एम. मुन्शी

कन्हैयालाल मानेकलाल मुंशी; एक सुप्रसिद्ध वकील, लेखक, आणि स्वातंत्र्यसैनिक, त्यांनी राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांच्या मांडणीसाठी योगदान दिले.

K.M Munshi | sakal

एन. गोपालस्वामी अय्यंगार

काश्मीरशी संबंधित धोरणांमध्ये योगदान देणारे प्रशासक, तसेच मसुदा प्रक्रियेतील महत्त्वाचे सल्लागार होते.

N. Gopalaswami Ayyangar | sakal

टी. टी. कृष्णमाचारी

काँग्रेस पक्षाचे सदस्य आणि कुशल प्रशासक, त्यांनी मसुदा समितीत डी. पी. खेतान यांच्या जागी काम पाहिले.

T. T. Krishnamachari | sakal

सय्यद मोहम्मद सादुल्ला

ब्रिटिशकालीन भारतात आसामचे पहिले प्रधानमंत्री, मुस्लिम लीगचे सदस्य, त्यांनी राज्यघटनेच्या मसुद्याच्या चर्चांमध्ये अल्पसंख्याकांच्या हितांचा मुद्दा मांडला.

Syed Muhammed Saadulah | sakal

पुरुषांसाठी खास फॅशन टिप्स! हिवाळ्यातही दिसा स्टायलिश

Men's Fashion Wear | sakal
आणखी वाचा