Payal Naik
प्राण्यांचं विश्व हे अगदी वेगळं असतं. ते त्यांच्या वेळेनुसार, त्यांच्या स्वभावानुसार स्वतःसाठी चांगलं निवडतात.
निसर्गाने प्राण्यांना त्यांचं रक्षण करण्यासाठी बुद्धी दिलेली आहे. त्याच्या जोरावरच ते निसर्गातले बदल आत्मसात करतात.
प्राणी जे वागतात त्यामागे निसर्गाची काहींना काही किमया असते. त्यामागे कारण असतं.
दिग्गज वन्यजीव अभ्यासक, लेखक मारुती चितमपल्ली यांनी त्यांच्या ३६ वर्षाच्या नोकरीत प्राण्यांबद्दल असे अनेक अनुभव घेतले आहेत.
वनाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी आपली ६५ वर्ष जंगलात काढली आणि प्राण्यांचं निरीक्षण केलं.
त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी मुंगुसाविषयी माहिती दिली आहे.
मुंगूस हे पिल्लासह रस्ता ओलांडताना कायम पिलांना एकमेकांची शेपटी पकडायला लावतात. यामागे रस्ता चुकणं हे कारण नाही.
मारुती चितमपल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंगूस हा उडणाऱ्या पक्षांचा शत्रू आहे. घार, गरुड त्यांची शिकार करतात.
त्यामुळे जेव्हा मुंगूस रस्ता ओलांडतात तेव्हा आपल्या पिलांना एकमेकांची शेपटी पकडायला सांगतात. जेणेकरून ते रस्ता ओलांडत असताना हवेतून उडणाऱ्या कोणत्याही पक्षाचा हा कोणतातरी वेगळाच प्राणी असल्याचा गैरसमज होईल.
आणि ते त्यांच्यावर हल्ला करणार नाही. परिणामी मुंगूस आणि त्याची पिल्लं जिवंत राहतील.
डोंबिवलीच्या 'या' शाळेत शिकली आहे तेजश्री प्रधान