सकाळ डिजिटल टीम
मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराची खूप काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे चिकू रक्तातील साखरेची पातळी वाढवते का? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी फळे खाणे फायदेशीर आहे, परंतु फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असावा.
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल, तर तुम्ही चिकू (Sapodilla) खाणे टाळावे. चिकू खाल्ल्याने साखरेची पातळी वाढू शकते.
चिकूमध्ये उच्च कॅलरीज असतात. यामुळे मधुमेहाच्या बाबतीत चिकू खाणे हानिकारक ठरू शकते
मधुमेहींनी चिकू खाऊ नये, कारण त्यात ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, त्यामुळे शरीरात साखर वाढते.
मधुमेहाच्या रुग्णांनी सफरचंद, संत्री, केळी, पपई आणि किवी अशी फळे खावीत. हे खाल्ल्याने साखरेची पातळी वाढत नाही.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.