Yashwant Kshirsagar
बिल गेट्स यांच्यासोबतच्या व्हिडिओमुळे नागपुरचा डाॅली चहावाला जगभरात प्रसिद्ध झाला आहे.
डाॅली मागील 16 वर्षांपासून नागपुरात अनोख्या स्टाईलने चहा विकतो. तो आता सेलिब्रिटी बनला आहे.
काही दिवसांपूर्वी डाॅलीने दुबईत आॅफिस उघडले होते. त्याचे फोटोही त्याने शेअर केले होते.
आता डाॅलीने दुबईत आणखी एक स्वप्न पूर्ण केले आहे. त्याने इंस्टाग्रामवर स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले आहे.
डाॅली चायवाला ने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात तो घर खरेदी करताना दिसत आहे.
डाॅली चहावाला एका दुबईतील एका बिल्डरच्या ऑफिसमध्ये पोहचतो.
तेथे घराचे फोटो पाहतो. त्याला दिलेल्या पर्यायांपैकी एक घर आवडते.
पुढील काही मिनिटांत तो ते घर बुक करतो. त्याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात येते.