Monika Shinde
संत्र्याच्या साली एका बरणीत भरून त्यात व्हिनेगर घाला. हे मिश्रण १-२ आठवडे ठेवा आणि नंतर गाळून घ्या. पाणी मिसळून नैसर्गिक क्लीनर म्हणून वापरा.
संत्र्याच्या साली वाळवून पावडर बनवा आणि ती पावडर नारळाचे तेल किंवा दह्यासोबत मिक्स करा. हे मिश्रण केसांच्या मुळांमध्ये लावा.याने केस गळणे कमी होते, केसांना चमक येते.
संत्र्याच्या साली वाळवून त्यांची पावडर बनवा. ती पावडर मध, दही किंवा गुलाबजलामध्ये मिसळून चेहऱ्यासाठी नैसर्गिक स्क्रब तयार करा.त्वचेतील मृत पेशी काढून टाकते, चेहरा उजळतो.
संत्राच्या सालीचे २ तुकडे करा. आतला सर्व गर कडून घ्या. आणि वितलेली मेणबत्ती, वात, २- ३ लवंग आणि कापुर घाला आणि सेट व्हायला ठेवा व नंतर ते जाळून टाका.
संत्र्याचे साली फेकून न देता. त्याचे तुकडे करून साखरेच्या सहाय्याने स्वादिस्ट कॅण्डी बनवा.आणि मुलांना पौष्टिक खाऊ घाला. हा पदार्थ कमी पैशात आणि स्वादिस्ट होतो.
संत्र्याच्या साली उकळत्या पाण्यात घालून १०-१५ मिनिटे ठेवा. नंतर गाळून त्या पाण्यात मध किंवा लिंबू घालून प्या. याचे सेवन केल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते आणि पचन सुधारते.
Tulsi Tea : तुळशीचा चहा प्यायल्याने आरोग्याला नेमके कोणते फायदे होतात, जाणून घ्या