सकाळ वृत्तसेवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर जागतिक पातळीवरील एक अत्यंत विद्वान अर्थशास्त्रज्ञ होते.
1915मध्ये त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात MA ही पदवी प्राप्त केली. 1917 मध्ये त्यांनी त्याच विद्यापीठातून PhD मिळवली. यानंतर 1921 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या नामांकित संस्थेतून D.Sc (Economics) ही पदवी त्यांनी मिळवली.
परदेशात शिक्षण घेत असताना डॉ. आंबेडकर यांनी अर्थशास्त्रावर तीन अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. हे ग्रंथ आजही महत्त्वाचे आहेत.
1923ला इंग्लंडमध्ये डॉ. आंबेडकर यांनी 'The Problem of Rupee: Its Origin and Solution' हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी रुपयाच्या ऐतिहासिक उत्क्रांतीचे विश्लेषण केले आहे.
या ग्रंथाच्या तयारीदरम्यान त्यांनी जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ केन्स यांच्याशी चर्चा केली.
बाबासाहेबांचे विचार इतके प्रगल्भ होते की, आजही ते तितकेच उपयुक्त वाटतात.
1926मध्ये ब्रिटिश सरकारने रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेसाठी हिल्टन यंग आयोग नेमला.
या आयोगासमोर डॉ. आंबेडकरांनी आपले विचार स्पष्टपणे मांडले.
1934 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक कायदा संमत झाला आणि 1 एप्रिल 1935 रोजी RBI ची स्थापना झाली.
ही बँक स्थापन करताना डॉ. आंबेडकरांच्या 'The Problem of Rupee' या ग्रंथातील विचारांचा आधार घेण्यात आला. त्यांच्या विचारांवरच रिझर्व्ह बँकेच्या कार्यपद्धतीची दिशा ठरवण्यात आली.
त्या काळात डॉ. बाबासाहेब राजकारणात सक्रिय होते – मोर्चे, आंदोलनं आणि पक्ष बांधणी सुरू होती. तरीही रिझर्व्ह बँकेच्या संकल्पनेमागे त्यांचाच विचारांचा पाया होता.
बाबासाहेबांनी मांडलेली आर्थिक नीती ही आजही भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया आहे.