Amit Ujagare (अमित उजागरे)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक निष्णात वकीलही होते. त्यांनी अनेक महत्वाचे खटले लढले, त्याचे काही मुलगामी परिणामही झाले आहेत.
असाच पुण्यातील एक खटला त्यांनी लढला, हा खटला हारुनही ते जिंकले होते. हा खटला होता 'समाजस्वास्थ्य' नावाच्या मासिकाबाबतचा.
१९३४ साली रघुनाथ धोंडो कर्वे या समाजसुधारकानं एक मोहिम सुरु केली होती ती म्हणजे लोकांमध्ये फॅमिली प्लॅनिंगबाबत जनजागृती करण्याची.
आपल्या लिखानातून वैज्ञानिकदृष्टीकोन आणि आधुनिक वैद्यकशास्त्राची सांगड घालून त्याचं महत्व ते सांगायचे.
पण त्यावेळी म्हणजे आजपासून साधारण नव्वद वर्षांपूर्वी लैंगिकतेवर बोलणं हे मोठं पाप समजलं जायचं. त्यामुळं कर्वे रुढीवाद्यांच्या टार्गेटवर असायचे.
त्यामुळं अनेकदा न्यायालयीन लढाया देखील लढाव्या लागल्या, पण त्यांच्या सोबतीला कोणी नसायचं. ते एकट्यानेच या कोर्ट-कचेऱ्यांना उत्तर द्यायचे.
यामध्ये अपवाद फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते कारण, त्यांनी रा. धो. कर्वेंच्या या आधुनिक विचारांना कायम पाठिंबा दिला. बाबासाहेब कायम व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूनं राहिले आहेत.
जेव्हा अश्लिल लिखाणाच्या नावाखाली हायकोर्टात खटला चालला त्यावेळी न्यायाधीशांनी मुद्दा मांडला की, "विकृत प्रश्नांवर चर्चाच का करायची? त्यावर बाबासाहेब म्हणाले होते की, "जर विकृती असेल तर ती त्यासंबधीच्या वैज्ञानिक ज्ञानानेच दूर होईल"
पण चांगल्या युक्तीवादानंतरही बाबासाहेब हा खटला हारले. त्यावेळी र. धो. कर्व्यांना २०० रुपयांचा दंड झाला. पण आज त्याच लैंगिक विषयावर कायदे केले जात आहे. कोर्ट याबाबत उदारमतवादी दृष्टीकोनातून निकाल देत आहेत. त्यामुळं बाबासाहेब त्यावेळी जरी हा खटला हारले असले तरी ते आज जिंकले आहेत, असं म्हणावं लागेल.