बाळकृष्ण मधाळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, कृषीतज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक आहेत. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. ते त्यांच्या पालकांचे 14 वे आणि शेवटचे अपत्य होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सकपाळ होते. ते ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते.
भारतीय संविधानात सर्वात महत्त्वाचा वाटा असणाऱ्या बाबासाहेबांचा 6 डिसेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या दादर येथे 'महापरिनिर्वाण दिन' होतो.
बाबासाहेब बौद्ध धर्माचे प्रवर्तक आणि महान बोधीसत्त्व होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली.
बाबासाहेबांनी अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. त्यांनी महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले.
अशा या महामानवाने निपाणीत एकेकाळी प्रवेश केल्याने निपाणीनगरी पावन झाली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याचं कारणही तसंच आहे.
सन 11 एप्रिल 1925 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा निपाणी, बेळगाव (कर्नाटक राज्य) येथील सरकारी डाक बंगल्यावर मुक्कामासाठी आले होते. आताचे IB ऑफिस.
त्यावेळी दत्तोबा आनंदा कराळे (रा. निपाणी) नामक व्यक्तीनं त्यांचा पाळीव पांढरा शुभ्र सजवलेला घोडा बाबासाहेबांना बसण्यासाठी दिला होता. त्यावेळेचा हा दुर्मिळ असा फोटो प्रकाशझोत आला आहे.
कराळे हे त्यांचा पांढरा शुभ्र घोडा त्यावेळी कोणत्याही मिरवणूक, वरातीसाठी नेत असतं. या शिवाय, बाबासाहेबांची जिथे-जिथे सभा असेल, तिथे त्यांचा हा घोडा असायचा.
हा डॉ. आंबेडकरांचा एकमेव अश्वारूढ दुर्मिळ फोटोचा उल्लेख बळवंत हणमंतराव वराळे यांच्या 'डॉ. आंबेडकरांचा सांगाती' या पुस्तकात आढळतो.
बळवंत वराळेंना डॉ. आंबेडकरांचा तब्बल 35 वर्षांचा सहवास लाभला आहे. त्यांनी डॉ. आंबेडकरांविषयी अनेक जवळून पाहिलेल्या आठवणींचा खजिना या पुस्तकात उतरवला आहे.
बाबासाहेबांच्या एकमेव अश्वारूढ दुर्मिळ फोटोबाबची ही आठवण, माहिती निपाणी येथील संग्रहित अर्टिस्ट दीपक मधाळे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषांचे दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन) यांनी दिली आहे.