सकाळ वृत्तसेवा
यशवंत ऊर्फ भैय्यासाहेब हे रमाबाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकमेव अपत्य होते. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा त्यांनी पुढे नेला.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर भैय्यासाहेबांनी धम्मकार्य व समाजसेवेचा वसा घेतला.
सुरुवातीला त्यांनी सिमेंटचा कारखाना सुरु केला, त्यानंतर प्रिटिंग प्रेस चालवून विचारप्रसाराचे कार्य सुरू ठेवले.
ही दोन्ही मुखपत्रं भैय्यासाहेब यांनी नेटाने चालवली. व्यवस्थापन आणि संपादन त्यांनी सांभाळले.
बाबासाहेबांचा महत्त्वाचा ग्रंथ 'थॉट्स ऑन पाकिस्तान' याचे प्रकाशन भैय्यासाहेबांनी केले. बाबासाहेबांनी हे पुस्तक भैय्यासाहेब आणि मुकुंदरावांना अर्पण केले.
भैय्यासाहेबांनी अनेक स्मारकांची स्थापना केली. चैत्यभूमी हे त्यांच्या समर्पणाचे सर्वात मोठे उदाहरण आहे.
बाबासाहेबांनी एका लालुचखोर ठेकेदारामुळे यशवंतरावांना थेट घरून जेवण न देता मुंबईला परत पाठवले – हे त्यांच्या आयुष्याला वळण देणारे क्षण.
कोर्टाच्या रांगेत ते इतरांसारखेच उभे राहिले. ओळख पटली तरीही विशेष वागणूक नाकारली.
बाबासाहेबांच्या शिकवणुकीचा आदर्शवत वारसदार म्हणून भैय्यासाहेबांनी आपले जीवन खर्ची घातले.