Pranali Kodre
फास्टफूड, कमी हालचाल आणि सतत बसून काम केल्याने पोट व कंबर वाढते. याला 'मिडराईज ओबेसिटी' म्हणतात.
कधी वजन वाढतं, कधी कमी होतं – त्यामुळे कपड्यांच्या साइजमध्ये सतत बदल होतो.
मिडराईज ओबेसिटी असलेल्या व्यक्तींनी कपड्यांची निवड थोडी विचारपूर्वक केली पाहिजे.
ब्रॉड बॉटमच्या पँट्स मिडराईज ओबेसिटी लपवतात आणि स्टायलिश लूक देतात.
कमरेला इलॅस्टिक असलेल्या पँट्समुळे वजन थोडंफार वाढलं किंवा कमी झालं तरी पँट आरामात बसते.
ब्रॉड बॉटम पँटवर ए-लाईन टॉप घातल्यास सुंदर, स्मार्ट लूक मिळतो.
घेरदार प्लाजो वजन लपवतो आणि आरामदायक असतो. वापरायला अतिशय सोपा.
प्लाजोच्या कमरेला इलॅस्टिक बेल्ट असल्याने वजन बदललं तरी कपडे फिट बसतात.
शॉर्ट टॉप किंवा लॉन्ग कुर्ती – दोन्ही प्लाजोवर छान दिसतात.
मिडराईज ओबेसिटी ही सौंदर्यावर मर्यादा नाही. योग्य कपडे निवडून स्मार्ट आणि आत्मविश्वासपूर्ण राहा!