Aarti Badade
सकाळी रिकाम्या पोटी गुळाचे पाणी प्यायल्याने हाडे मजबूत होतात, कारण यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असतो.
गुळाचे पाणी प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यामुळे संसर्ग आणि इतर आजारांपासून संरक्षण मिळते.
गुळामध्ये शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे गुणधर्म असतात. यामुळे यकृत डिटॉक्स होते आणि शरीर स्वच्छ होते.
गुळाचे पाणी पिणे पचन क्रिया सुधारते आणि आम्लपित्त व बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवते.
गुळ पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. रिकाम्या पोटी गुळाचे पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित होतात.
गुळाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर आठवड्यात २-३ वेळा गुळाचे पाणी प्यायल्याने फायदा होतो. मधुमेही रुग्णांनी हे पाणी पिणे टाळावे.
कोणताही आरोग्यासंबंधी त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या