सकाळ डिजिटल टीम
साधारणपणे, ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
पण तुम्हाला माहिती आहे का, की ग्रीन टी पिणे काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते, कसे ते जाणून घ्या..
गर्भवती महिलांनी ग्रीन टीचे सेवन करू नये, कारण त्यात असलेले कॅटेचिन कंपाऊंड (Catechin Compound) तुमची चिंता वाढवू शकते आणि ते मुलांसाठी देखील धोकादायक ठरू शकते.
जर तुम्ही मोतीबिंदूचे रुग्ण असाल, तर तुम्ही ग्रीन टी पिऊ नये. कारण, त्यामुळे डोळ्यांवर दबाव येऊ शकतो.
अशक्तपणाच्या रुग्णांनी ग्रीन टी पिणे देखील टाळावे, कारण ते शरीराला लोह योग्यरित्या शोषण्यापासून रोखते.
ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे, त्यांनीही ग्रीन टी पिऊ नये. कारण, त्यात टॅनिन नावाचा घटक असतो, जो पोटातील आम्ल वाढवतो.
ज्यांना चिंता आहे, त्यांच्यासाठी ग्रीन टी पिणे खूप हानिकारक असू शकते. कारण, त्यात कॅफिन असते जे तुमच्या चिंतेची लक्षणे वाढवू शकते.