Aarti Badade
केस गळणे, मुरुमे किंवा वजन कमी करण्यासाठी अनेकजण भरपूर पाणी पितात, पण गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
सेलिब्रिटींच्या हातातील मोठ्या आणि आकर्षक पाण्याच्या बाटल्या पाहून अनेक तरुण तहान नसतानाही सतत पाणी पितात.
शरीराच्या गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी होऊ शकते, या स्थितीला हायपोनेट्रेमिया म्हणतात.
सोडियमचे संतुलन बिघडल्यामुळे मळमळणे, डोकेदुखी, चक्कर येणे, सुस्ती आणि स्नायूंमध्ये पेटके येण्यासारखी लक्षणे दिसू शकतात.
अतिपाणी पिल्यामुळे रक्तातील सोडियम खूप कमी झाल्यास मेंदूच्या पेशींना सूज येऊ शकते आणि गंभीर परिस्थितीत झटके किंवा बेशुद्धावस्था येऊ शकते.
प्रत्येक व्यक्तीची पाण्याची गरज वय, वजन, हवामान आणि शारीरिक हालचालींनुसार बदलते, त्यामुळे सर्वांसाठी एकच प्रमाण योग्य नसते.
तहान, शरीराचे संकेत आणि लघवीचा रंग लक्षात घेऊन पाणी प्या, एकाच वेळी भरपूर पाणी पिणे टाळा आणि केवळ फॅशन म्हणून हायड्रेशनचा अतिरेक करू नका.