सकाळ वृत्तसेवा
संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप आहे.
देशमुख यांच्या नातेवाईकांनी वाल्मिकला मिळत असलेल्या सुविधांची यादीच समोर आणली आहे.
आधी वाल्मिक कराडला शासकीय रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याचा प्रकार उघड झाला होता.
आता २३ मुद्द्यांचं एक पत्र देशमुख यांच्या नातेवाईकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.
कराड आणि विष्णू चाटे यांना संभाजीनगरच्या कारागृहात वर्ग करण्याचे आदेश असताना कराडला बीडमध्ये ठेवले आहे. तर चाटेला लातूरला हलवले आहे.
वाल्मिक कराड, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांना एकाच बरॅकमध्ये ठेवलेले आहेत, यासाठी पैसे घेतल्याचा आरोप आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाल्मिक कारडला एक ते दोन तास बोलू दिलं जात आहे.
एवढंच नाही तर १६ फेब्रुवारी रोजी सकाळी एका जेल कर्मचाऱ्याने कराडला निकोटीन नशेचे औषध दिल्याचा देशमुख कुटुंबियांचा आरोप आहे.
याशिवाय १५ जानेवारी रोजी वाल्मिक कराडला स्पेशल चहा देण्यात आला. १८ फेब्रुवारी रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी बोलावून त्याला जेवण, चहा देण्यात आला.
तसेच वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना एकत्रित ठेऊन काही कर्मचारी त्यांना मदत करीत आहेत, असा आरोप आहे.