Aarti Badade
बाहेर थंडी वाढली की गरम सूप पिण्याची मजा काही वेगळीच असते. त्यात शेवग्याच्या शेंगांचे सूप असेल तर आरोग्यासाठी दुप्पट फायदा होतो.
Drumstick Soup Recipe
Sakal
शेवग्याच्या शेंगा, कांदा, टोमॅटो, आलं-लसूण, हिरवी मिरची, जिरे, हिंग, मीठ आणि काळी मिरी पावडर. पौष्टिकतेसाठी थोडी मसूर डाळही वापरू शकता.
Drumstick Soup Recipe
Sakal
कुकरमध्ये शेंगांचे तुकडे, कांदा, टोमॅटो, आलं-लसूण आणि डाळ घालून ३-४ शिट्ट्या करून व्यवस्थित शिजवून घ्या.
Drumstick Soup Recipe
Sakal
मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची बारीक प्युरी करा. आता गाळणीने गाळून घ्या, जेणेकरून शेंगांचे तंतू वेगळे होतील आणि आपल्याला स्मूथ सूप मिळेल.
Drumstick Soup Recipe
Sakal
एका पातेल्यात साजूक तूप गरम करा. त्यात जिरे आणि हिंगाची फोडणी द्या. यामुळे सूपची चव आणि सुगंध दोन्ही वाढतात.
Drumstick Soup Recipe
Sakal
तयार फोडणीत सूप टाकून त्यात मीठ, काळी मिरी पावडर आणि आवडीनुसार चिली फ्लेक्स घाला. २-३ मिनिटे चांगली उकळी येऊ द्या.
Drumstick Soup Recipe
Sakal
शेवग्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते. हे सूप प्यायल्याने सांधेदुखी कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
Drumstick Soup Recipe
Sakal
तयार आहे तुमचे 'सुपर हेल्दी' शेवग्याचे सूप! हिवाळ्यात रात्रीच्या जेवणाआधी किंवा संध्याकाळी हे सूप पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
Drumstick Soup Recipe
Sakal
Health Benefits of Mutton
Sakal