Anushka Tapshalkar
थंड व कोरडी हवा, गरम वातावरण आणि पाण्याची कमतरता यामुळे ओठांमधील ओलावा लवकर निघून जातो. ओठांची त्वचा नाजूक असल्याने ती पटकन कोरडी, फाटलेली व काळवंडलेली दिसू लागते.
Dry Lips
लिप बाम ओठांवर संरक्षणात्मक थर तयार करतो. Beeswax, shea butter, cocoa butter, ceramides यांसारखी घटक ओठांना खोलवर पोषण देतात आणि ओलावा बंदिस्त ठेवतात.
Lip Balm
sakal
जर ओठ फारच कोरडे, दुखत असतील किंवा फाटलेले असतील तर लिप बाम उत्तम पर्याय आहे. रात्री झोपण्यापूर्वी लावण्यासाठी लिप बाम अधिक परिणामकारक ठरतो.
sakal
लिप ऑइल हे हलक्या टेक्सचरचे असते आणि स्किनकेअर + मेकअप असा दुहेरी फायदा देते. Jojoba oil, rosehip oil, almond oil, squalane यामुळे ओठांना ओलावा आणि नैसर्गिक चमक मिळते.
Lip Oil
sakal
दिवसाच्या वेळेस, बाहेर जाताना किंवा glossसारखा लूक हवा असेल तेव्हा लिप ऑइल योग्य आहे. ते ओठांवर जड वाटत नाही आणि पटकन शोषले जाते.
Lip Oil
लिप बाम खोलवर दुरुस्ती आणि संरक्षणासाठी उपयुक्त असतो, तर लिप ऑइल दैनंदिन ओलावा आणि ग्लोसाठी योग्य ठरतो. त्यामुळे रात्री बाम आणि दिवसा ऑइल वापरणे अधिक फायदेशीर मानले जाते.
sakal
आठवड्यातून एकदा साखर + मध स्क्रब करा. रात्री झोपण्यापूर्वी तूप किंवा नारळ तेल लावा. भरपूर पाणी प्या आणि हिवाळ्यातही SPF असलेले लिप प्रॉडक्ट वापरा.
DIY Lip Balm
Sakal