Early Cancer Symptoms: कॅन्सर अचानक होत नाही! महिनाभर आधी शरीर देतं धोक्याचं संकेत...

Monika Shinde

कॅन्सर

कॅन्सर अचानक होत नाही. गंभीर होण्याआधी शरीर महिनाभर आधीच धोक्याचे संकेत देत असतं. ही लक्षणं ओळखली तर वेळेत उपचार शक्य आहे.

Cancer Warning Signs

|

esakal

कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण

पुरेशी झोप घेऊनही सतत थकवा, कमजोरी किंवा उत्साहाचा अभाव जाणवत असेल, तर ते केवळ ताणतणाव नसून कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं.

Cancer Warning Signs

|

esakal

अचानक वजन कमी होणं

डाएट किंवा व्यायामात बदल न करता अचानक वजन कमी होणं हा शरीराचा गंभीर इशारा आहे. अशा बदलांकडे दुर्लक्ष करणं भविष्यात धोकादायक ठरू शकतं.

Cancer Warning Signs

|

esakal

हिमोग्लोबिन कमी होणं

कारण नसताना हिमोग्लोबिन कमी होणं किंवा अ‍ॅनिमिया होणं ही कॅन्सरची ‘सायलेंट’ लक्षणं असू शकतात, असं तज्ज्ञ डॉक्टर स्पष्ट करतात.

Cancer Warning Signs

|

esakal

त्वचेवरील तीळ रंग

त्वचेवरील तीळ रंग, आकार बदलणं, जखमा उशिरा भरणं किंवा त्वचेचा रंग बदलणं ही स्किन कॅन्सरची चेतावणी असू शकते.

Cancer Warning Signs

|

esakal

त्वचेवर खाज येणं

सतत खाज येणं, त्वचेवर रक्तस्राव होणं किंवा कोणताही बदल दीर्घकाळ टिकून राहणं ही सामान्य गोष्ट नाही. वेळीच तपासणी गरजेची आहे.

Cancer Warning Signs

|

esakal

किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करू नका

कॅन्सर हळूहळू वाढतो, पण सुरुवातीला शरीर स्पष्ट संकेत देतं. दुर्दैवाने, हे संकेत अनेकदा थकवा किंवा किरकोळ आजार समजून दुर्लक्षित होतात.

Cancer Warning Signs

|

esakal

डॉक्टरांचा सल्ला घ्या

लक्षणं वेळेत ओळखली तर कॅन्सरवर उपचार शक्य आहेत. शंका वाटल्यास उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर तपासणीच जीव वाचवते.

Cancer Warning Signs

|

esakal

Ghee Dry Fruits: दररोज तुपातले ड्राय फ्रूट्स खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Ghee Dry Fruits

|

esakal

येथे क्लिक करा