Amit Ujagare (अमित उजागरे)
म्यानमार, बँकॉक आणि थायलंडमध्ये मोठं नुकसान करणाऱ्या तीव्र भूकंपामुळं मेनू ब्रिक बौद्ध मठाची झालेली अवस्था.
म्यानमारच्या मंडेलातील महामुनी पॅगोडाला अनेक ठिकाणी तडे गेले असून या विहाराच्या आवारात उभारलेला भगवा गौतम बुद्धाची मूर्तीही उद्ध्वस्त झाली आहे.
मैखथिला शहरातील रस्ते भूकंपामुळं खचले आहेत. यामुळं जमिनीचा समतोलपणा नष्ट झाल्यानं पुन्हा या ठिकाणी रस्ते तयार करणं महाकठीण काम असेल.
या भूकंपामुळं थायलंडमध्येही मोठे धक्के जाणवले, हे धक्के इतके भीषण होते की, त्यामुळं एका गगनचुंबी हॉटेलचं हे भायनक दृश्य. टेरेसवरील स्विमिंग पूलमधून खाली पाणी कोसळतानाचा व्हिडिओ.
थायलंडमधील स्थानिकांच्या घरांना तडे गेले आहेत, यामुळं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
बँकॉक शहरातील रस्त्यांवरुन रहदारी सुरु असताना अचानक भूकंपाचे धक्के बसल्यानं रस्ते उखडले गेले. यामुळं एक धावती कार अशी अडकून पडली होती.
म्यानमारमधील नागरिकांना या भूंकपाचा सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. यामध्ये घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्यानं १६०० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
म्यानमारच्या भूकंपातील हे सर्वात विदारक दृश्य आहे. कारण एक बडी इमारत पत्त्यांप्रमाणं कोसळल्यानंतर त्याच्या ढिगाऱ्यातून नागरिकांना वाचवताना प्रशासन.
हा व्हिडिओ तुमचं लक्ष विचलित करु शकतो. कारण रस्त्यावरील नागरिकांनी या भूकंपाची सर्वात भीषण दृश्ये पाहिली आहेत.