सकाळ डिजिटल टीम
आहारात बाजरीचा समावेश केलात तर फायदा होईल.
बाजरीत कर्बोदके २५ टक्के, फायबर १७ टक्के, प्रथिने २२ टक्के, उष्मांक ७५६ किलो कॅलरीज, जीवनसत्त्व बी ६ - ७६८ मायक्रो मि.ली., जीवनसत्त्व ई १०० मायक्रो मि.लि., कॅल्शियम १६ मि.लि., लोह ६ मि.लि., मॅग्नेशियम २२८ मि.लि. ग्रॅम असते.
बाजरीतील अॅन्टी ऑक्सिडन्ट्स विषारी मुक्त कण नष्ट करतात, यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. तसेच, मुत्रपिंड आणि यकृत स्वच्छ ठेवतात.
बाजरी धान्यात मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम असतात, जे रक्तवाहिन्यांना संकुचित होण्यापासून वाचवतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि रक्तपुरवठा नियमित होतो.
बाजरीतील तंतुमय पदार्थामुळे घातक कोलेस्ट्रॉल (चरबी) कमी होतो, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
बाजरीतील मॅग्नेशिअम इन्सुलिन आणि ग्लुकोज रिसेप्टर्सची क्षमता वाढवतो, ज्यामुळे मधुमेह नियंत्रित राहतो.
बाजरीतील तंतुमय पदार्थ महिलांमध्ये स्तन कॅन्सरवर उपयुक्त ठरतात. हे कॅन्सर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
बाजरीतील तंतुमय घटक जठरातील चयापचय क्रिया नियंत्रित करतात, ज्यामुळे पचनसंस्था व्यवस्थित कार्य करते. नियमित पचनामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.