Aarti Badade
रात्री हलका आणि योग्य आहार घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते. काही पदार्थ आहेत जे रात्री खाल्ल्यास तुमचे मेटाबोलिझम वाढते आणि चरबी साठत नाही.
ग्रीक दही प्रथिनांनी भरलेलं असतं आणि त्यात कॅलरीज कमी असतात. रात्री खाल्ल्यास पोट भरलेलं वाटतं आणि भूक नियंत्रणात राहते.
पनीरमध्ये केसीन नावाचे प्रथिने असते, जे हळूहळू पचते. त्यामुळे ते रात्री स्नायूंना पोषण देते आणि पोट भरलेलं राहतं.
बदाममध्ये हेल्दी फॅट्स, फायबर आणि मॅग्नेशियम असतं. ते झोप सुधारतं आणि पचनसंस्थेच्या कार्याला मदत करतं, ज्यामुळे वजन कमी होऊ शकतं.
किवीमध्ये फायबर भरपूर असते आणि कॅलरीज कमी. रात्री खाल्ल्यास पचन सुधारतं आणि भूकही कमी लागते.
कॅमोमाईल चहा झोप सुधारतो, ताण कमी करतो आणि भूक नियंत्रणात ठेवतो. झोप उत्तम असेल तर वजन कमी करणं सोपं होतं.
रात्री हलकं, प्रथिनंयुक्त आणि पचनास मदत करणं अन्न घेतल्यास तुम्हाला डाएट न करता वजन कमी करता येईल.