कार्तिक पुजारी
माध्यम सम्राट आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक चेरुकुरी रामोजी राव यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं आहे.
रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक असण्याबरोबरच त्यांनी अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.
रामोजी फिल्म सिटी ही आशियातील सर्वात मोठी फिल्म सिटी म्हणून ओळखली जाते. फिल्म सिटीचा परिसर २ हजार एकरमध्ये पसरलेला आहे.
इनाडू वृत्तपत्र, ईटीव्ही नेटवर्कचे टेलिव्हिजन चॅनल आणि चित्रपट निर्माण कंपनी उषा-किरण मुव्हीज याची त्यांनी सुरुवात केली होती.
मार्गदर्शी चीट फंड, डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स, कलनजली शॉपिंग मॉल, प्रिया पिकल्स आणि मयुरी फिल्म ड्रिस्टिब्युटर्स इंडस्ट्री या व्यवसायात त्यांनी मोठी झेप घेतली होती.
रामोजी राव यांचा एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्म झाला होता. राव यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९३६ रोजी मद्रास प्रांतातील कृष्णा जिल्ह्यातील पेदापरपुड्डीमध्ये झाला होता.
रामोजी राव यांनी सुरुवातीच्या काळात काही भारतीय वस्तू तत्कालीन सोविएत रशियात निर्यात करायचे.
त्यानंतर त्यांनी चीट फंडचा व्यवसाय सुरू केला केला, ज्यात त्यांना मोठे यश मिळालं. त्यानंतर त्यांनी लोणचे बॉटल, तसेत तेलुगु आणि इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले