सकाळ वृत्तसेवा
दूध आणि अंडं हे दोन्ही पौष्टिक मानले जातात. पण अनेक जण हे दोघं एकत्र घेतात… हे योग्य आहे का?
अंड्यात प्रोटीन, कॅल्शियम, आयरन व व्हिटॅमिन A असतं. दूध वजन नियंत्रित करतं आणि हाडं बळकट करतं.
फिटनेससाठी किंवा प्रोटीनसाठी काही जण दूधात कच्चं अंडं टाकून पीतात. पण याचा परिणाम सगळ्यांवर सारखाच होतो का? तर नाही
कच्चं अंडं आणि दूध एकत्र घेतल्यास शरीराला प्रोटीन आणि ऊर्जा मिळते. काही ठराविक लोकांसाठी हे उपयुक्त ठरू शकतं.
काही वेळा हे कॉम्बिनेशन शरीरासाठी घातक ठरू शकतं. विशेषतः पचन कमजोर असेल तर.
कच्च्या अंड्यात सॅल्मोनेला जंतू असू शकतात. यामुळे फूड पॉइझनिंग, उलटी, जुलाब, पोटदुखी होऊ शकते.
अंड्यातलं प्रोटीन काही लोकांना सहन होत नाही. त्यामुळे अंगावर सूज, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि त्वचेला खाज येऊ शकते.
गर्भवती महिलांनी कच्चं अंडं आणि दूध एकत्र घेणं टाळावं. यामुळे बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
जर तुम्ही अंडं आणि दूध एकत्र घेत असाल, तर एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं.