Yashwant Kshirsagar
अंड्यामध्ये प्रोटीन, व्हिटामिनस मिनरल्स असतात, अंड्याचे सेवनाचे आरोग्याला खूप फायदे असतात.
अंड्यामध्ये व्हिटामिन ए, डी, ई आणि बी 12 , रिबोफ्लेविन, फोलेट, आयर्न, सेलेनियम आढळते.
पण आपल्यातील अनेक लोक अंडे चुकीच्या पद्धतीने खातात आणि विशेषकरुन त्यांना याची माहिती देखील नसते.
त्यामुळे अंडे खाताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे, नाहीतर आरोग्याचे नुकसान होऊ शकते.
अंडे चांगले उकडून खाणे आवश्यक आहे, अंडे जरा देखील कच्चे राहिले तर तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.
कच्च्या अंड्याचे पाणी पिऊ नये, त्यातून तुम्हाला संपूर्ण प्रोटीन मिळत नाही.
तसेच कच्चे अंडे पचवणे सोपे नसते, अंडे उकडल्यानंतर प्रोटीन एकमेकांत मिसळतात आणि पचनसंस्थेसाठी देखील योग्य असते.
अंडे उकडून खाणे योग्य असते पण जास्त प्रमाणात उकडले तर त्यातील पोषक घटक गायब होतात.
याशिवाय अंड्यातील पिवळ्या भागात कोलेस्ट्राॅल असते, पण जास्त तापमानावर उकडल्यावर हे कोलेस्ट्रॉल आॅक्सिटेलमध्ये रुपांतरित होते.
या ऑक्सिटोलमुळे हृदयरोगाचा धोका निर्माण होऊ शकतो.
(सुचना: हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. सकाळ याची पुष्टि करत नाही. )