सूरज यादव
राजस्थानमधील जयपूर इथं एका हत्तीच्या फोटोशूटवरून वाद निर्माण झालाय. एका रशियन फोटोग्राफरने फोटोशूटसाठी हत्तीला गुलाबी रंगाने रंगवलं होतं.
Viral pink elephant
Esakal
फोटोग्राफरने हत्तिणीला गुलाबी रंगाने रंगवल्यानंतर काही महिन्यातच हत्तिणीचा मृत्यू झाला. रशियन फोटोग्राफरने फोटो पोस्ट केल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केलाय.
Viral pink elephant
Esakal
चंचल हत्तिणीचा मृत्यू ४ फेब्रुवारी २०२६ रोजी झाला. ती गावची सर्वात वृद्ध हत्तीण होती. तिच्या मृत्यूच्या काही दिवसांनी फोटो व्हायरल झाले आहेत.
Viral pink elephant
Esakal
हत्तिणीला लावलेला रंग हा २० ते २५ मिनिटांसाठी लावला होता आणि तो नैसर्गिक होता. पाण्याने तो सहज धुवून निघाला होता असं गावकऱ्यांनी सांगितलं.
Viral pink elephant
Esakal
जयपूरच्या हत्ती गाव विकास समितीच्या अध्यक्षांनी हत्तिणीच्या मृत्यूवरून सुरू असलेल्या वादावर स्पष्टीकरण दिलंय. चंचल नावाच्या हत्तिणीचं वय ६५ वर्षे होतं.
Viral pink elephant
Esakal
हत्ती गावात एखाद्या हत्तीचा मृत्यू होतो तेव्हा डॉक्टरांच्या टीमकडून शवविच्छेदन होतं. चंचल हत्तिणीचंही शवविच्छेदन डॉक्टरांनी केलं होतं.
Viral pink elephant
Esakal
हत्ती गावच्या विकास समिती अध्यक्षांनी हत्तिणीचा मृत्यू रंगामुळे नव्हे तर वयोवृद्ध झाल्यामुळे झाल्याचं सांगितलं.
Viral pink elephant
Esakal
हत्तीचं सरासरी आयुष्य ६५ ते ७० वर्षे इतकं असतं. पूर्ण वाढ झालेल्या हत्तींचं वजन अडीच ते ३ हजार किलोपर्यंत असू शकतं.
Viral pink elephant
Esakal
Pune rain news
ESakal