Pranali Kodre
सध्या चित्रपटगृहांमध्ये मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. १८ जुलै २०२५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.
प्रेम, भावना आणि नात्यांमधील गुंतागुंत असलेला हा चित्रपट पाहून थिएटरमध्येच चाहते रडतानाही दिसले आहेत.
दरम्यान, सैयारा हा पहिलाच असा चित्रपट नाही, जो अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी आहे. अशाच काही भावनिक चित्रपटांबद्दल जाणून घेऊ.
माहेरची साडी हा मराठी चित्रपट असून अत्यंत हृदयस्पर्शी कथा आहे. अल्का कुबल या लक्ष्मीच्या मुख्य भूमिकेत असून तिचा सासरी होणारा छळ आणि तिची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
रांझना हा चित्रपट हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी यांची कथा सांगणारा चित्रपट आहे. प्रेम, त्याग आणि नियती अशा विषयांवर आधारित हा चित्रपट आहे.
जितेंद्र जोशी आणि उर्मिला कानिटकर मुख्य भूमिकेत असलेला काकण हा मराठी चित्रपट प्रेमभंग आणि त्यानंतर होणारी घालमेल यावर आधारीत चित्रपट आहे. हा चित्रपट किसू आणि सुधा या दोन भूमिकांची गोष्ट सांगतो.
आशिकी २ ही कथा आहे अपयशी गायक असणारा राहुलची जो आरोही हिला एक यशस्वी गायिका बनवतो. तो तिच्या प्रेमातही असतो. पण त्याच्या दारूच्या व्यसनाचा परिणाम तिच्या करियरवर होतो. त्यानंतर तो आयुष्यच संपवतो.
सलमान खान मुख्य भूमिकेत असलेल्या तेरे नाम हा चित्रपटाची थीम आत्यंतिक प्रेमाची विनाशकारी ताकद, अशी असून यात राधे मोहनची कथा असून तो निरजराच्या प्रेमात वेडा होतो आणि त्याचे वेड त्याला विनाशाकडे नेते.
रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेला रॉकस्टार हा चित्रपट जिद्द आणि प्रेमभंगाची ताकद यावर अधारित आहे. जनार्दन झाखड (जॉर्डन) याचा रॉकस्टार बनण्याच्या प्रवासाची कथा या चित्रपटात आहे.
महेश कोठारे दिग्दर्शित चिमणी पाखरं हा चित्रपटही अत्यंत हृदयस्पर्शी आहे. त्याग, कुटुंब आणि मातृत्वाच्या आव्हानांबाबत सांगणारा हा चित्रपट आहे.
सनम तेरी कसम ही प्रमकथा असून यात प्रेम, त्याग, समर्पण यावर आधारीत हा चित्रपट आहे.
अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी मुख्य भूमिकेत असलेल्या बागबान या चित्रपटात वृद्ध दाम्पत्याची कथा दाखवण्यात आली आहे.
१९८१ मध्ये प्रदर्शित झालेला एक दूजे के लिए हा चित्रपटही अत्यंत भावनिक असून हृदयस्पर्शी प्रेमकथा आहे. यात कमल हसन आणि रति अग्निहोत्री मुख्य भूमिकेत आहेत.
येथे क्लिक करा
https://www.esakal.com/ampstories/web-story/rajkummar-rao-likely-to-play-role-of-sourav-ganguly-in-biopic-reports-psk96